गेल्या काही काळात राज्यातील उष्णतेचा पारा चांगलाच चढलेला आहे.
उन्हाच्या तीव्रतेने मनुष्य हैराण होत असताना मुक्या जनावरांनाही याचा फटका बसतोय.
वाढत्या उन्हामुळे दूध उत्पादन क्षमता कमी होत असून दूध पातळ येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.
तसेच दुभत्या जनावरांच्या जीविताला धोकाही निर्माण होण्याची शक्यता असते.
उत्तम आहार, गोठ्याचे नियोजन आणि काही महत्त्वपूर्ण बाबींची पूर्तता केल्यास धोका टाळता येतो.
उन्हाच्या काळात जनावरांना मोकळ्या जागी चरायला सोडू नये.
गोठा पत्र्याचा असेल तर त्यावर, कडबा, पालापाचोळा, गवत टाकून पत्रा गरम होणार नाही याची दक्षता घ्यावी.
दुभत्या जनावरांना स्वच्छ, थंड आणि दिवसातून 4-5 वेळा पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे.
जनावरांना उन्हाळ्यात शक्यतो ओला चारा देण्याचा प्रयत्न करावा, असे डॉक्टरांनी सांगितले.
घाम व इतर माध्यमातून क्षार बाहेर पडत असल्याने आहारात मिठाचा समावेश करावा, असे डॉक्टर सांगतात.
विद्यार्थ्यांनी वाचवली वनराई!
Click Here