बासरी वादनाला भारतात एक कला म्हणूनच नाहीतर अध्यात्मिक महत्त्व देखील आहे.
बासरीच्या मधुर सुरांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रीकृष्णाला मुरलीधर म्हणूनच ओळखलं जातं.
असंच अनेकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम नागपूरमधील युवा 'बांसुरीवाला' करतोय.
शुभम चोपकर असं या बासरी वादकाचं नाव असून तो सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे.
शुभमला लहानपणापासूनच आवड असल्यामुळं वयाच्या 6 वर्षांपासूनच बासरी वादन सुरू झालं.
पुढे नागपुरातील अरविंद उपाध्ये, पंडित प्रमोद देशमुख यांच्याकडून शास्त्रीय संगिताचे धडे घेतले.
प्रख्यात बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे शुभमची ज्ञान साधना सुरूच आहे.
सध्या शुभमकडे 24 हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिकच्या बासरी आहेत.
क्लासिकल आणि वेस्टर्न या दोन्ही प्रकारच्या बासुरी त्याच्याकडे आहेत.
आगामी काळात प्रोडक्शन बेस फ्युजन सूत्र नावानं स्वत:चा बँड काढण्याचा संकल्प त्यानं केलाय.
बैलगाडी अपघातानं घडवला लेखक!
Click Here