नागपुरात सापडल्या ब्रिटिशांच्या तोफा!

नागपूर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. 

ब्रिटिश काळात नागपूरकर भोसले आणि ब्रिटिश यांच्यात सीताबर्डीची लढाई झाली. 

या ऐतिहासिक लढाईच्या पाऊलखुणा कस्तुरचंद पार्क परिसरात आढळल्या आहेत. 

ब्रिटिशांनी भोसलेंविरोधात वापरलेल्या तोफा या ठिकाणी आढळल्या आहेत.

यातील काही तोफा लांब पल्ल्याच्या तर काही कमी पल्ल्याच्या आहेत. 

त्यावर किंग जॉर्ज तिसरा असे ठळक अक्षरात अंकित चिन्ह पाहायला मिळते.

आता हाच ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा जपण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

तोफांना गंज चढू नये म्हणून योग्य ती रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. 

नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात या तोफा ठेवण्यात येणार आहेत. 

त्यामुळे इतिहस प्रेमी, अभ्यासक आणि संशोधकांसाठी याचा फायदा होणार आहे. 

वाघांच्या संख्येबाबत आली Good News!

Click Here