नागपूरची लिटल चॅम्पियन!

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण नागपूरच्या अठरा महिन्याच्या श्रीनंदा देशकरनं खरी केलीय. 

श्रीनंदानं इतक्या लहान वयात थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्वत:चं नाव नोंदवलंय. 

तिचं इंडिया बुकमध्ये नाव नोंद होण्याचं कारणही तितकंच खास असून तुम्हीही तिचं नक्की कौतुक कराल.

नागपूरातील शुभंकर आणि मधुरा देशकर यांची मुलगी श्रीनंदाची स्मरणशक्ती थक्क करणारी आहे. 

श्रीनंदा आता दीडशेपेक्षा जास्त वस्तूंची नावं सांगू शकते आणि फळाची चवही ओळखू शकते. 

वयाच्या 8-9 महिन्यापासूनच तिला वृत्तपत्र आणि खेळातील कार्डवरील चित्रांचं विशेष आकर्षण होतं. 

श्रीनंदानं 'प्रशंसा श्रेणी' अंतर्गत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (IBR) मध्ये प्रवेश मिळवला. 

श्रीनंदाला वयाच्या 17 व्या महिन्यात जवळ जवळ 200 हून अधिक वस्तूंची ओळख पटली होती. 

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी अठरा महिने पूर्ण होणं आवश्यक असतात. 

रेकॉर्डसाठी 44 घरगुती वस्तू, 31 पशुपक्षी, 23 खाद्यपदार्थ, शरीरराचे 12 अवयव, 12 हिंदू देवता आदी बिनचूक ओळखलं

देशसेवेचा वारसा जपत सिद्धीची भरारी!

Click Here