सिद्धेश्वर यात्रेतील नागफणी काय आहे?

 श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. 

मानाच्या सर्व नंदिध्वजना साजवण्याचे काम सुरु झाले आहे. या सजावटीमध्ये नागफणीचे विशेष महत्त्व आहे. 

गेल्या 100 ते 125 वर्षापासून गणेचारी परिवाराकडे ही नागफणी बनवण्याचा मान आहे.

यंदाच्या वर्षी सुबक पद्धतीनं ही नागफणी   सजावण्यात येणार आहे. 

 पितळ पेपर, कागद, रंगबेरंगी प्रकारच्या माळा आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या माध्यमातून नागफणी सजवली जाणार आहे. 

कशी सजवली जाते नागफणी? 
बांबू आणि काठ्यांचा वापर करून एक विशिष्ट साचा बनवला जातो. 

 तो साच्या व्यवस्थित बांधून घेतला जातो. त्यानंतर त्याच्या सर्व बाजूंना फेविकॉल किंवा खळ लावून रंगीत कागद चिटकवला जातो.

 नंतर पाच तोंड असणारी नागफणी ही नंदीध्वजाच्या वरच्या बाजूस लावली जाते.

वरती गोल डैलारा उभा केला जातो तोच खेळणी म्हणून सुद्धा ओळखतात, असं सचिन गणेचारी यांनी सांगितले.