तब्बल 500 किलोची घंटा असलेलं मंदिर

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील धामंत्री इथलं नागेश्वर महादेवाचे स्वयंभू शिवलिंग मंदिर आहे.

हे पुरातन आणि प्राचीन देवालय एका अखंड दगडाला कोरून 5000 वर्षांपूर्वी बांधण्यात आलं आहे. 

मंदिरात महाकाय 512 किलो वजनाची घंटा आहे. 

 ही घंटा वाजल्यानंतर सुमारे 1 ते 2  किलोमीटर परिसरात त्याचा निनाद गुंजतो.

सण 1921 साली माजरी म्हसला येथील पंजाबराव पाटील या भविकाने आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर हा भव्य घंटा दिला होता. 

 मंदिराच्या प्रत्येक खांबावर तसेच आतून व बाहेरून छोट्या छोट्या मूर्ती कोरलेल्या आहेत. 

मंदिरात दर सोमवारी विविध कार्यक्रम तसेच महाशिवरात्री दरम्यान भागवत सप्ताह तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.