टोमॅटोच्या दरवाढीचा फटका, प्रसिद्ध वडापाव झाला बंद
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर चांगलेच वाढले आहेत. घाऊक बाजार टोमॅटोची आवक कमी होत असल्याने दराने उच्चांक गाठला आहे.
टोमॅटोचे दर घाऊक बाजारामध्ये 100 ते 120 रुपये प्रति किलो तर किरकोळ बाजारात हाच दर 150रुपयांपर्यंत गेल्याचे दिसत आहे. याचाच परिणाम आता हॉटेल व्यावसायिकांवर झालाय.
अनेक हॉटेलमधून टोमॅटो गायब झालेत. टोमॅटोचं भाजीतील प्रमाण कमी करण्यात आलंय. त्याचबरोबर मुंबईच्या प्रसिद्ध टोमॅटो वडापावला देखील याचा फटका बसलाय.
मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या धारावी परिसरात जुना पोस्ट ऑफिस संत रोहिदास मार्गावर गेल्या दहा वर्षापासून महेंद्र काळे हे वडापावचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या स्टॉलवर टोमॅटो वडापाव हा प्रसिद्ध झाला होता.
सध्या गगनाला भिडलेल्या टोमॅटोच्या दराने काही काळ हा वडापाव बंद असणार आहे. मुंबईतील अनेक खवय्ये याठिकाणी टोमॅटो वडापावची चव चाखण्यासाठी येत असतात.
पेट्रोलपेक्षाही सध्या टोमॅटोचे दर वाढल्याने हा वडापाव विक्री करणे परवडत नाही, त्यामुळे तो बंद करण्यात आलाय.
काही महिन्यांपूर्वी आम्ही नवीन फ्युजन म्हणून टोमॅटो वडापाव सुरू केला होता. त्यंत वेगळा आणि चविष्ट असलेल्या या वडापावला मुंबईकरांनी डोक्यावर घेतलं.
सध्ये टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आम्ही काही काळ वडापाव बंद करण्याचा निर्णय घेतलाय,' अशी माहिती या वडापावचे मालक महेंद्र काळे यांनी दिलीय.
दुबईच्या बिर्याणीचा घ्या बदलापुरात आस्वाद!
Click Here