मुंबईत प्रदूषणामुळे 6 हजार 757 जणांचा मृत्यू 

  मुंबई शहराच्या हवेतील प्रदुषणात सातत्यानं वाढ होत आहे.

गोवंडी या शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांचं आयुष्यही प्रदुषणामुळे धोक्यात आलंय. 

प्रदूषणापासून सुटका व्हावी म्हणून नागरिकांनी एअर फिल्टरदेखील वापरण्यास सुरुवात केली आहे.

एअर फिल्टर प्रत्येकाला परवडणारे नाही. 

त्यामुळे गळा घोटणाऱ्या प्रदूषणावर सुटका व्हावी या मागणीसाठी गोवंडीकर आक्रमक झाले आहेत.

 एसएमएस कंपनी आणि सिमेंट मिक्सर प्रकल्प गोवंडी परिसरात प्रदूषणाचा धोका वाढत आहे.

या प्रकल्पांचा परिणाम इथल्या राहिवाशांवर झाला आहे.

प्रदूषणाने किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती अधिकार कार्यकर्ते शेख फैयाज आलम यांनी मागितली होती. 

पालिकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार मागच्या पाच वर्षात 6 हजार 757 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

 यामध्ये क्षयरोग, दम्याचे आजार, हृदयविकार अशा आजारांचा समावेश होता.