लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली सुरू केला भन्नाट कॅफे
मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या दादरमध्ये राहुल कॅफे आहे.
कॅफे म्हंटलं की चांगलं इंटेरिअर, एसी असेल असं तुम्हाला वाटेल. पण राहुलचा कॅफे साधा आहे.
रस्त्यावर एका झाडाखाली सुंदर डिझाईन केलेल्या गाडीमध्ये त्यानं हा कॅफे सुरू केलाय.
याच कॅफेत उत्तम प्रकारचे मिल्कशेक्स मिळतात.
लॉकडाऊनमध्ये राहुलचा जॉब गेला.
त्यानंतर त्यानं घरातूनच मिल्कशेक्स विक्रीला सुरूवात केली.
आपल्या घरगुती कॅफेला त्यानं लॉकडाऊन कॅफे असं नाव दिलं.
कॅफेत तयार केलेला मिल्कशेक अनेकांना आवडला, असं राहुलने सांगितलं.
50 रुपये ते 200 रुपयांच्या आत वेगवेगळे मिल्कशेक इथं मिळतात.
कॅफेचा पत्ता
26, एस. एस. मार्ग, राधिका साईकृपा को. ऑप. सोसायटी नायगाव, दादर, मुंबई.