हापूसचे दर यंदा कमी का आहेत?

नवी मुंबईच्याएपीएमसी मार्केटमध्ये सर्वत्र आंब्याचा सुंगध दरवळ आहे. 

मात्र, हापूसची किंमत यंदा नेहमीपेक्षा कमी असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

 सिझनच्या सुरुवातीलाच हापूसची किंमत का घसरली? 

हाच ट्रेंड यापुढेही कायम राहणार का? असे प्रश्न ग्राहकांना पडले आहेत. 

त्याची उत्तरं आम्ही देणार आहोत.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या वर्षी गुढी पाडव्याला आंब्याच्या 15000 पेट्या दाखल झाल्या होत्या.

यावर्षी त्याच्या चौपट म्हणजे 60000 पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. 

देवगड, रत्नागिरी, राजापूर, वेंगुर्ला, मालवण,या भागातून हापूस आंब्याच्या पेट्यांची संख्या यामध्ये मोठी आहे. 

आवक वाढल्यानं हापूसचे दर कमी झाले आहेत.

गेल्या वर्षी मान्सून आणि फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत तीव्र उष्णतेचा समावेश होता.

त्यामुळे यावर्षी आंब्याचे पीक चांगले झाले. 

अवकाळीचा फटका कोकणाला जास्त प्रमाणात बसला नाही. 

 850 ते 2,200 रुपये प्रती डझन असा या आंब्याचा दर आहे.