मुंबईतील सर्वात स्वस्त शूट मार्केट
गरिबांपासून ते गर्भश्रीमंतांच्या गरजा भागवण्याचे ठिकाण म्हणजे ‘मुंबईतील बाजार’ मानला जातो.
मुंबईतील प्रसिद्ध कामाठीपुरा भागात दीड गल्ली असून इथं मुंबईचं सिक्रेट मार्केट लागतं.
दीड गल्लीत 1950 पासून भरणाऱ्या या बाजाराला गुप्त बाजार असंही म्हटलं जातं.
कामाठीपुरा मधील दीड गल्लीत हा बाजार शुक्रवारी पहाटे चार वाजता भरतो आणि आठ वाजता बंद होतो.
पूर्वी हा बाजार फक्त शुक्रवारी भरायचा पण आता शुक्रवार आणि गुरुवारी असा दोन दिवस भरतो.
मुंबईच्या आसपासच्या छोट्या कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात याठिकाणी माल येतो.
व्यापारी काही ब्रँडेड कंपनीकडून सदोष माल खरेदी करतात आणि दुरुस्त करून अर्ध्या किमतीत विकतात.
8 हजार रुपये किमतीचे ब्रँडेड शुज दीड गल्लीच्या रस्त्यावर सुमारे 1500 रुपयांना उपलब्ध होतात.
तर 8 हजार किमतीचे चमड्याचे बूट दीड गल्ली बाजारात केवळ 800 रुपयांना मिळतात.
दीड गल्ली मार्केटमध्ये रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून इथं लोकांची मोठी गर्दी असते.
इथं मिळतात 150 रुपयांपासून साड्या!
Click Here