पावसाळी शूजची करा ‘या’ मार्केटमध्ये स्वस्त खरेदी
मान्सूनचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. काही दिवसांमध्येच मुंबईत मान्सून दाखल होईल.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी पावसाळी चप्पल आणि बूट या वस्तूंची खरेदी करण्याची मुंबईकरांची लगबग सुरू झालीय.
कमी किंमतीमध्ये पण, ट्रेंडिंग वस्तू घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.
या वस्तू खरेदी करण्याचं मुंबईतील एक खास मार्केट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कुर्ला परिसरात चप्पल आणि बूट खरेदी करण्यासाठी शूज मार्केट आहे.
या मार्केटच्या नावानंच हा परिसर ओळखला जातो.
या मार्केटमध्ये कमी किंमतीमध्ये क्रोक्स, फ्लीप फ्लॉप, संडल, शूज, फॉर्मल, पोलीस शूज असे विविध पावसाळी प्रकार उपलब्ध आहे.
या शुजची किंमत 250 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंत आहे.