रोजच्या वापरात किंवा ऑफिसमध्ये जाण्यासाठी महिलांना पर्स लागते.
ही पर्स एकाच पद्धतीची न घेता वेगवेगळ्या पद्धतीच्या घेण्याचा महिलांचा प्रयत्न असतो.
महिलांची ही आवड लक्षात घेऊन अनेक पद्धतीच्या तसंच आकाराच्या पर्स बाजारात उपलब्ध आहेत.
सध्या मुंबईच्या बाजारात सिल्क, कॉटन, कलमकारी नक्षी, प्लास्टिक ट्रान्सपरंट, जूटच्या पर्सचा ट्रेंड सुरु आहे.
त्यामध्ये सर्वात जास्त मागणी ही जूट पर्सची आहे.
दादरच्या मार्केटमध्ये जूटच्या पर्सचं सुंदर कलेक्शन पाहायला मिळतं.
या पर्स इथं अगदी स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहेत.
लाल, क्रीम, निळा,गुलाबी,काळा, मल्टी कलर अश्या विविध रंगांमध्ये या पर्स उपलब्ध आहेत.
100 रुपये ते 450 रुपयांच्या रेंजमध्ये या पर्स मिळतात.