गुढीपाडव्याच्या ड्रेसचा 'इथं' संपेल शोध

मराठी नववर्षाचा दिवस असलेला गुढी पाडवा आता काही दिवसांवर आला आहे. 

वर्षाच्या पहिल्या दिवसाचं स्वागत घरामध्ये गुढी उभारुन करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे.

त्याचबरोबर या दिवशी नवीन ड्रेस घालण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो.

गुढीपाडव्याचं स्वागत करण्यासाठी मुंबईतील बाजारपेठ सज्ज झालीय.

पाडव्याला एखादा नवीन प्रकारचा ड्रेस तुम्ही शोधत असताल तर तुमचा शोध इथं संपेल.

मुंबईतील दादर मार्केटमध्ये दरवर्षी पाडव्या निमित्त नवा ट्रेंड पाहयला मिळतो. 

यावर्षी देखील पाडव्यासाठी खास ड्रेस या बाजारात दाखल झाले आहेत. 

यावर्षी पैठणी ड्रेसला विशेष मागणी आहे. 

ओढणी, पायजमा, कुर्ती असा थ्री पीस सेट आहे.

हे ड्रेस 1000 रुपयांच्या आत तुम्ही खरेदी करू शकतात. 

भगवान कटपीस सेंटर, रानडे रोड येथे हे ड्रेस उपलब्ध आहेत.