आता आला चॅाकलेट ब्राउनी मोमो! 

मोमोज हे विशेषतः उत्तर भारतात लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. सध्या स्ट्रीट फूडमध्ये मोमोजची क्रेझ आहे. 

लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत हा स्ट्रीट फूडचा प्रकार सर्वांच्या पसंतीस पडत आहे. 

त्यामुळे मोमोजमध्ये अनेक फ्युजन प्रकार देखील मार्किटमध्ये उपलब्ध झाले आहेत. 

व्हेज आणि नॉन व्हेज असे अनेक पर्यायांबरोबर लोक आवडीने मोमोजचा आस्वाद घेत आहेत.

मुंबईतही रस्त्यावर ठिकठिकाणी मोमोजचे स्टॉल पहायला मिळतात. 

त्यापैकीच एका स्टॉलवर चॉकलेट ब्राउनी मोमो मिळत असून या स्टॉलवर खवय्यांची गर्दी असते.

मुलुंडच्या हॉली एंजेल्स हायस्कूलच्या परिसरात असलेले महाजन फूड कॉर्नर स्टॉलवर चॉकलेट ब्राउनी मोमो मिळतो.

या स्टॉलच्या मालकीण अरुणा महाजन आहेत. या स्टॉलवर अनेक प्रकारचे फ्युजन मोमोज आणि बर्गर देखील मिळतात. 

येथील मोमोजचे वैशिष्ट्य म्हणजे येथे बनणारे मोमोज हे क्लबस्टाइल मोमोज या पद्धतीने तयार केले जातात.

या चॉकलेट ब्राउनी मोमोमध्ये चॉकलेट ब्राउनी केकचे मिश्रण असते. ज्याचे बाहेरील कोटिंग हे तांदळाच्या पिठाचे केलेले असते. 

 त्या मोमोला उकडून घेऊन त्याला चॉकलेट सिरप सोबत सर्व्ह केले जाते.

या मोमोजची किंमत 60 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत आहे.