100 हून जास्त कुत्र्यांची आई!

सध्याच्या काळात आपल्या जवळच्या व्यक्तींना मदत करण्यापूर्वी देखील अनेकदा विचार करणारी मंडळी आहेत. 

प्राण्यांचा विचार करणे ही तर दूरची गोष्ट आहे. प्राण्यांना मारणे, त्यांच्याशी गैरवर्तन करणे यासारख्या घटना वेगवेगळ्या भागातून समोर येत आहेत. 

माणूस आपले दु:ख व्यक्त करू शकतो. पण, मुक्या प्राण्यांना तसं करता येत नाही. 

त्यामुळे त्यांचे हाल आणखी वाढतात.मुंबईजवळच्या वसईमध्ये एक तरुणी या प्राण्यांची पालक बनली आहे.

वसईमध्ये राहणारी हरसिमरन वालिया ही 22 वर्षांची तरुणी 100 पेक्षा जास्त कुत्र्यांची काळजी घेत आहे. 

हरसमिरन ही रस्ते अपघातात किंवा अन्य कारणांनी जखमी झालेल्या प्राण्यांसाठी बचाव केंद्र चालवते. 

 ती 5 वर्षाची होती तेव्हापासून तिला या प्राण्यांचा लळा लागलाय.

विशेषत: जखमी तसच भटक्या कुत्र्यांवर तिचं मोठं प्रेम आहे. ती त्यांना कुटुंबातील सदस्य मानते.