महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
यामध्ये अनेक सामान्य कुटुंबातील तरुणांनी यश मिळवत खाकी वर्दीचं स्वप्न साकार केलंय.
बीड जिल्ह्यातील वाघोरा येथील शेतकरी पुत्र विजय कोंडिबा लोंढे दुसऱ्याच प्रयत्नात फौजदार झाला आहे.
जिद्द आणि मेहनतीच्या बळावर विजयनं मोठं यश संपादित केलं असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
वडिलांसोबत शेती करतच विजयनं पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा अभ्यास केला.
विजयचं प्राथमिक शिक्षण वाघोरा तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण किटी आडगाव येथे झालं.
बीड येथे कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर 2018 मध्ये त्याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली.
विशेष म्हणजे विजयनं यासाठी कुठलेही क्लासेस न लावता सेल्फ स्टडी करून हे यश मिळवलंय.
घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्याने अनेकदा वडिलांसोबत शेतामध्ये काम देखील केले.
आई-वडिलांनी मोठ्या कष्टानं मला शिकवलं त्यामुळे मी त्यांचा खूप ऋषी आहे, असं विजय म्हणतो.
अन्वीनं दुसऱ्यांदा केली मोहीम फत्ते!
Click Here