शेतकऱ्याची लेक झाली वनाधिकारी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या वन विभागाच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.

 या परीक्षेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश हे प्रेरणा देणारं आहे. 

जालना जिल्ह्यातील सोनाली शेषराव इंगळे या शेतकऱ्याच्या लेकीची रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवड झालीय. 

शिरजगावच्या शेतकऱ्याच्या या लेकीनं अनेक अडचणींवर मात करत हे यश मिळवलंय.

या निवडीनंतर गावकऱ्यांकडून तिचा खास सत्कारही करण्यात आला.

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन राजपत्रित अधिकारी झालेल्या सोनालीचे पाचवीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव वाघरूळ या ठिकाणी झाले.

 त्यानंतर त्यांनी नवोदय विद्यालयात बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्या नेट-सेट परीक्षाही उत्तीर्ण झाल्या.

त्याचकाळात आई-वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं.

या प्रवासात त्यांना त्यांच्या पतीची भक्कम साथ मिळाल्याचे सोनाली इंगळे सांगतात.