पहिल्याच प्रयत्नात अक्षय झाला RFO!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या वन विभागाच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.
यामध्ये अक्षय लांभातेने वनअधिकारी पदाला गवसणी घातली आहे.
अक्षय बाळू लांभाते हा पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीचा रहिवासी आहे.
अक्षयचे पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, जारकरवाडी येथे झाले आहे.
गावातीलच आदर्श माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीला 90 टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला.
बारावीत 80 टक्के गुणांसह अक्षय हा तालुक्यात तृतीय आला होता.
इंजिनिअरिंगचे शिक्षण त्याने पुण्याच्या पी. व्ही. जी. कॉलेजमधून घेतले आणि प्रिंटींग इंजिनिअरिंग ही पदवी मिळवली.
मात्र, त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन पुर्णवेळ हा अभ्यासासाठी दिला.
योग्य अभ्यास आणि नियोजनामुळेच त्याने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी परीक्षेत यश मिळवले.
सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून 16 व्या क्रमांकाने आणि आरक्षित प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे.
सांगलीच्या पैलवानाची थंडाई पोहोचली दुबईत!
Click Here