आईला ट्रकने चिरडले, रस्त्यावर पडून राहिला मुलीचा बर्थडे केक
काही घटना इतक्या धक्कादायक असतात की, त्या ऐकल्यावर मन अगदी सुन्न होते.
अशीच एक धक्कादायक घटना हरयाणाच्या कर्नालमध्ये घडली.
सुप्रिया या 30 वर्षांच्या एका महिलेने आपल्या मुलीची बर्थडे पार्टी ठेवली होती.
ही पार्टी येथील हवेली हॉटेलमध्ये ठेवण्यात आली होती. सर्वजण तिथे पोहोचले होते.
सुप्रिया यांनी आपल्या 3 वर्षाच्या मुलीसाठी स्पेशल बार्बी डॉल केक बनवला होता.
यानंतर त्या आपल्या मैत्रिणीसह हा केक घेऊन स्कूटीवर हॉटेलच्या ठिकाणी जात होत्या.
पण रस्त्यातच तिच्या स्कूटीला टँकरने मागून जोरदार धडक दिली. यात सुप्रिया यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, पार्टीच्या ठिकाणी असलेल्या लोकांना हादराच बसला. तर सुप्रिया यांची मैत्रीण या अपघातात जखमी झाली आहे.
सुप्रिया यांनी आपल्या मुलीसाठी जो केक बनवला होता, तो घटनास्थळीच पडून राहिला.