डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
दीक्षाभूमीवर रक्ताचा एकही थेंब न सांडता ही धम्म क्रांती झाल्याचं मानलं जातं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नागपूर एक वेगळं नातं आहे.
बाबासाहेबांच्या अनेक स्मृती नागपूरकरांनी जपल्या आहेत.
दरवर्षी 14 ऑक्टोबरला लाखो आंबेडकर अनुयायी नागपूर भेट देत असतात.
बाबासाहेबांचा सहवास लाभलेल्या नागपुरातील विविध ठिकाणांना भेटी देतात.
कमळेश्वर रोडवर असलेले चिचोलीतील शांतीवन हे असेच एक ठिकाण आहे.
धम्मचक्र परिवर्तन कार्यक्रमाची धुरा वामनराव गोडबोले यांनी पाहिली होती.
गोडबोले यांनीच शांतीवन येथे बाबासाहेबांच्या स्मृती जपल्या आहेत.
आता नागपुरातील चिचोली शांतीवन येथे जागतिक दर्जाचे संग्रहालय होत आहे.
14 एकर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर उभारले जात आहे.
आंबेडकरांच्या जीवनातील 1 हजारांहून अधिक वस्तू संग्रहालयात पाहायला मिळणार आहेत.
बाबासाहेबांचे खासगी सचिव नानकचंद रत्तू यांच्या संग्रहातील या वस्तू आहेत.
बाबासाहेबांनी संविधानाचा मसुदा तयार केलेला टाईप राईटर येथे आहे.
हायकोर्ट मध्ये बाबासाहेबांनी वापरलेला झगाही येथे ठेवण्यात आला आहे.
पेन, छत्री, टोपी, कोट, चष्मा अशा असंख्य वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत.
वामनराव गोडबोले यांनी आणलेला बाबासाहेबांचा अस्थिकलश देखील येथे आहे.
बाबासाहेबांच्या अनुयायी गोपिकाबाई ठाकरे यांनी बुद्धीस्ट सेमिनरीला जमीन दिली.
चिचोली येथे दान दिलेल्या 11.36 एकर जमिनीवरच संग्रहालय उभे राहत आहे.
जागतिक दर्जाचे हे संग्रहालय लवकरच सर्वांसाठी खुले होणार आहे.
चक्क रिक्षावर साकारली दीक्षाभूमी!
Click Here