चहा विक्रेत्याच्या मुलाचा फक्त 43 दिवसांमध्ये चमत्कार
नाशिकमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मुकेश जैन यांच्या मुलाने इंजिनिअर बनत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
युवा सिव्हील इंजिनिअर मयुर जैन यांनी एका कंपनीचे 8 हजार 415 स्क्वेअर फुटचे 105 दिवसांचा कालावधी लागणारे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अवघ्या 43 दिवसात पूर्ण केले आहे.
त्यामुळे त्यांची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया यामध्ये करण्यात आली आहे.
कसे पूर्ण केले बांधकाम?
यात पायाभरणी, प्लीथ फिलिंग, प्लीथ कास्टिंग, टाय बीम, पीसीसी, रेनफॉर्समेंट, पीटी स्लॅब कास्टिंग पर्यंतचे पूर्ण काम करण्यात आले आहे.
हे सर्व काम सर्व स्टॅंडर्ड मेंटेन करून करण्यात आले आहे. यामध्ये काँक्रीट स्ट्रेंथ सेन्सर लावण्यात आले आहे.
ज्याद्वारे मोबाईलवर ॲपद्वारे रियल टाइमिंग मध्ये काँक्रीटची खरी ताकद कळते. या कामाला व्यवस्थित व लवकर पूर्ण व्हावे यासाठी विशेष सेंटरिंग डिझाईन करण्यात आली आहे.
बांधकामाला लवकर ताकद मिळावी यासाठी विशेष केमिकलचा उपयोग करण्यात आला आहे तसेच या कामासाठी 50 कामगार दिवस रात्र झटत होते.
विशेष म्हणजे 43 दिवस संपल्यानंतर साधारणपणे 25 दिवस लागनारेस्लॅब उघडण्याचे काम फक्त 7 दिवसाच्या आत करण्यात आले असे इंजिनिअर मयुर जैन यांनी सांगितले.
संघर्षमय प्रवास
युवा इंजिनिअर मयुर जैन यांचे वडील मुकेश जैन हे एका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करत होते.
अशा बिकट परिस्थितीत मयुर जैन यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. वडिलांना कामात मदत करत त्यांनी सिव्हिल इंजिनिअर तसेच चार्टर्ड इंजिनीअरचे शिक्षण पूर्ण केले.