स्पायडरमॅन, छोटा भीम ते पुष्पा! आकर्षक पतंगांनी सजलाय बाजार

मकर संक्रांतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण आहे. बाजारात आकर्षक पतंग दाखल झाले असून खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.

यंदा बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगांची विक्री जोरात आहे.

संक्रांतीनिमित्त पतंगाची मोठी उलाढाल होत असते. बाजारातील पतंग खरेदीसाठी तरुण, बालकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठ खरेदीसाठी मोठी गर्दी वाढत आहे. मकर संक्रांत दिवशी पतंग उडवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. 

मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाचे सावट असल्यामुळे सण उत्सवावर निर्बंध होते. मात्र, यावर्षी निर्बंध हटवल्यामुळे नागरिक देखील आवडीने पतंगाची खरेदी करत आहेत.

यावर्षी बाजारामध्ये नवनवीन व रंगीबेरंगी पतंग दाखल झाले आहेत. 

लहान मुलांना आकर्षित करणारी स्पायडरमॅन, छोटा भीम मोटू, पतलू, पुष्पा असे आकर्षक पतंग दाखल आहेत.