संक्रांतीसाठी महिलांनी बनवले इको फ्रेंडली वाण
नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण मकर संक्रांत असतो. हा सण खास महिलांसाठी विशेष असतो.
सणानिमित्त सुगड पुजण्यापासून पुढील 15 दिवस हळदी-कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात. यात महिलांना वाण दिला जातो.
वाण देण्यासाठी बीडमधील महिलांनी पर्यावरणपूरक आकर्षक वस्तूंची निर्मिती केली आहे.
अल्प दरात या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
बीड मधील कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनी वाण देण्यासाठी लागणाऱ्या पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती केली आहे.
प्रशिक्षणातून महिलांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे बाजारात मिळणाऱ्या विविध वस्तूंपेक्षा या वस्तू नवीन पॅटर्नच्या आहेत.
शहरात जन शिक्षण संस्थेची स्थापना 2004 मध्ये झाली. विविध उपक्रम राबवून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचे काम जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे.