संक्रातीच्या तोंडावर कुंभार व्यावसायिक अडचणीत
संक्रांत सण अगदी काही दिवसांवर आला आहे. बीडमधील कुंभारवाड्यात तयार होणाऱ्या संक्रातीच्या मातीच्या सुगड्यांना जिल्ह्यातून मागणी असते.
सुगडी बनविण्याच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र, कुंभाराच्या पारंपारिक व्यवसायाला वाढत्या महागाईची झळ बसली आहे.
तयार वस्तूंना चांगला भाव मिळत नसल्याचे व्यावसायिक अडचणीत आहेत.
मकर संक्रांतीच्या सणाला सुवासिनी एकमेकांना वाण देतात. वाण देण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर केला जातो. त्यालाच सुगडे संबोधले जाते.
महागाईच्या काळामध्ये मातीचे सुगडे बनवणे कुंभाराला जड जात आहे.
वाढता इंधनाचा भाव, मातीची कमतरता, लाकडाची दरवाढ यामुळे कुंभार साहित्य बनविणे महागडे झाले असून साहित्याला बाजारात मिळत असलेला भाव देखील कमी आहे.
गेल्यावर्षी जोड खानाला 50 ते 60 रुपये एवढा भाव होता. यावर्षी जोड खणाला 80 ते 90 रुपये भाव मिळावा अशी अपेक्षा कुंभार बांधव करत आहेत.