आकर्षक पतंगाने सजलाय बाजार
मकर संक्रांतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण आहे.
बाजारात आकर्षक पतंग दाखल झाले असून खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.
यंदा बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगांची विक्रीही जोरात आहे.
दरवर्षी नागपुरात संक्रांतीनिमित्त पतंगाची मोठी उलाढाल होत असते.
बाजारातील पतंग खरेदीसाठी तरुण, बालकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
प्लास्टिक बंदीमुळे यंदा कागदी पतंगाला बाजारात चांगली मागणी आहे. शिवाय कापडी पतंग सुद्धा बाजारात बघायला मिळत आहे.
नागपुरात जवळपास 50 व्हरायटीचे पतंग असून कलकत्ता बनावटीच्या पतंग विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.