MA पास मुलगी पडली DJ वाल्याच्या प्रेमात, मग....
तुम्ही अनेक लव्हस्टोरी ऐकल्या असतील पण आम्ही तुम्हाला आज MA पास मुलगी आणि DJ वाले बापूची अनोखी लव्हस्टोरी विषयी सांगणार आहोत.
राजस्थानच्या चुरु येथे एका नवविवाहित जोडप्याला मारून टाकण्याची धमकी देण्यात आली.
मुलीच्या माहेरची लोक या लग्नामुळे नाराज होऊन मुलाला मारण्याची धमकी देत आहेत.
खासोली निवासी धर्मेंद्र भडिया हा DJ ऑपरेटर आहे.
तीन वर्षांपूर्वी एका लग्नात त्यांची भेट प्रियांका सोबत झाली होती.
यानंतर दोघ एकमेकांशी फोनवर बोलू लागले आणि ही मैत्री प्रेमात रूपांतर झाली.
23 वर्षीय प्रियांका ही MA पास असून धर्मेंद्र हा केवळ 12 वी पास आहे.
प्रियंकाने तिच्या माहेरच्या लोकांवर आरोप केला की जात वेगळी असल्याने तिच्या घरचे त्यांच्या लग्नाला मानण्यास नकार देत आहेत, तसेच तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत आहेत.
परंतु दोघांना एकत्र रहायचे असून आपले पती पत्नीचे नाते अजून पुढे न्यायचे आहे.