T-Shirts वरही दिसेल मराठीची गंमत!
नवीन फॅशनचे, आकर्षक रंगांचे टी शर्ट्स घालायला अनेकांना आवडतं.
त्याच्यावरील प्रिंट्सही सध्या चर्चेत असता.
तुम्ही टी शर्टवर वेगवेगळी नावं तसंच हिंदी किंवा इंग्रजी कोट्स लिहिलेलं पाहिलं असेल.
आता खास मराठी कोट्स असलेल्या टी शर्ट्स कलेक्शन ऑनलाईन उपलब्ध झालंय.
मुंबईकर मित्रांनी सुरु केलेलं हे कलेक्शन अवघ्या काही महिन्यातच लोकप्रिय झालं आहे.
रोहित गराटे आणि स्वप्नील हुद्दार या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या दोन मित्रांची ही संकल्पना आहे.
त्यांनी सुरूवातीला मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेतील कोट्स असलेल्या टी शर्टची विक्री केली.
काही दिवसांनी फक्त मराठी कोट्स असलेले टी शर्ट विकण्याचा निर्णय घेतला.
मराठी कोट्स असलेल्या टी शर्ट्सला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानंच त्यांनी हा निर्णय घेतला.
मोठ्यांच्या टीशर्ट्सची किंमत 350 ते 550 तर लहान मुलांच्या टी शर्ट्सची किंमत ही 299 ते 400 रुपयांच्या दरम्यान आहे.
अतरंगी टी शर्ट्स (https://atarangee.in/) या त्यांच्या खास साईटवर हे टी शर्ट्स मिळतात.