लोणावळा म्हटलं की सर्वांना तेथील निसर्गाची आठवण होते.
पावसाळ्यात तर येथील निसर्गसौंदर्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
लोणावळ्यात आलेला प्रत्येक पर्यटक त्याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारची चिक्की नक्कीच घेऊन जातो.
येथील मगणलाल चिक्की चांगलीच फेमस आहे. या चिक्कीचा इतिहास काय आहे ते पाहूया
मगनलाल चिक्कीला 19 व्या शतकात म्हणजेच 1888 साली सुरूवात झाली.
भेवारजी अग्रवाल यांनी त्यांचा मुलगा मगनलाल यांच्या नावानं मिठाईचं दुकान सुरु केलं होतं.
ते या दुकानात गुड-दानी तयार करुन विकत असत. शेंगदाणे साफ करुन ते ते बारीक करून त्यात गूळ घालायचा आणि बारीक कडक मिठाई ते बनवत असतात.
सागवानाच्या झाडाच्या कोरड्या पानात ती मिठाई देऊन दुकानात विकली जायची.
भेवारजी यांचं हे दुकान मुंबई-पुणे रेल्वे प्रवासादरम्यान स्टेशनच्या मोक्याच्या ठिकाणी होत.
त्यामुळं प्रवासा दरम्यान लोकांची दुकानावर चक्कर असायची. हळूहळू भेवारजी यांची ही गुड-दानी फेमस झाली.
त्याचबरोबर चवीप्रमाणे जिभेवर रेंगाळत राहील असं नाव देखील ठेवायला सांगितलं आणि तेव्हा चर्चेनंतर गुड-दानीला 'चिक्की' असं नाव देण्यात आलं, असं चिक्कीचे व्यवस्थापक आशुतोष अग्रवाल यांनी सांगितलं.