तूळ राशीसाठी ऑगस्ट महिना कसा असेल?
आपल्या आयुष्यात पुढे नेमकं काय घडणार आहे हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते.
बारा राशींपैकी तुला अर्थात तुळ राशीच्या व्यक्तींच्या मासिक राशिभविष्यात ऑगस्ट महिन्याबाबतीत काय सांगितले आहे.
याची माहिती कोल्हापूरच्या अरविंद वेदांते गुरुजींनी दिली आहे.
वेदांते गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात तुळ राशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम मिळण्याची शक्यता आहे.
त्यांना शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. त्यांचे जुने बिघडलेले नाते सुधारु शकते तसेच व्यावसायिक संबंधही दृढ होण्याचा अंदाज आहे.
तूळ राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये राहू, मंगळ, बुध गुरु, शुक्र आणि नेपच्युन हे ग्रह प्रगतीपथावर आहेत.
मात्र केतू या राशीसाठी अनिष्ट आहे. या व्यक्तींना ऑगस्ट महिन्यातील अधिक श्रावण महिन्यात चांगले ग्रहमान आहे.
ऑगस्टमधील निम्मा महिना हा अधिक महिन्यात तर उर्वरित श्रावण महिन्यात येतो. तुळ राशीच्या व्यक्तींच्या सांसारिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल.
विद्यार्थी वर्गाची अभ्यासातील प्रगती वाढेल. महिलांमध्ये समाजकार्यांची गोडी वाढेल. ज्या लोकांची शेती किंवा बागायत आहे त्यांचीही प्रगती होण्याची चिन्हं आहेत.
त्यामुळे तूळ राशीसाठी ऑगस्ट महिना फायदेशीर असेल, असं वेदांते गुरुजी यांनी सांगितलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
श्रावणात तुळशीचे हे नियम पाळा
Click Here