महाराष्ट्राची लोककला ठसकेबाज लावणी ही तमाम मराठी जनांची अस्मिता आहे
लावणी म्हटलं की आपल्याला एखादी लावणी सम्राज्ञी आठवते.
आता पुरुषही पायात घुंघरू बांधून आपल्या अदाकारीने लाखोंची मने जिंकू शकतो.
लावणी सम्राट शिवम विष्णू इंगळेनं हे करून दाखवलं आहे.
शिवम हाा मुळचा साताऱ्यातील असून सध्या लातूरमध्ये कृषी पदवीचे शिक्षण घेतोय.
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची लावणी बघून त्याला या नृत्य प्रकाराबद्दल आकर्षण वाटू लागलं.
पुणेकर यांच्या लावणीच्या कॅसेट्स आणून तो लावणी आणि त्यातील बारकाव्यांचे निरीक्षण करू लागला.
लावणीची आवड निर्माण झाली आणि त्याने स्वत:च्या पायात घुंगरू बांधायला सुरुवात केली.
मुलानं लावणी केल्यामुळं कुटुंबातूनही विरोध झाला, तरीही शिवमनं लावणी सोडली नाही.
बीडच्या गेवराईत शिवमनं सलग 26 तास लावणी करण्याचा विश्वविक्रम केला.
बाबासाहेबांच्या जीवनातील अमूल्य ठेवा!
Click Here