लग्न समारंभ असो की कुठलाही कार्यक्रम त्यात आवर्जून मॅचिंग बांगड्यांची मागणी होते.
भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या बांगड्या बनवल्या व विकल्या जातात.
महाराष्ट्रात आजही लग्न समारंभात बांगड्या भरण्याच्या कार्यक्रम होत असतो.
अशाच बांगड्यांची मोठी होलसेल बाजारपेठ लातूरमधील गंजगोलाई भागात आहे.
सोन्या-चांदीसोबत काचेच्या बांगड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते.
लातूरच्या परिघातील अनेक लोक येथे बांगड्यांची खरेदी करण्यासाठी येत असतात.
लातूर बाजारात जयपूर, फिरोजाबाद, दिल्ली, इंदोर, भोपाळ आदी ठिकाणांहून माल येतो.
10 रुपये डझन पासून ते अगदी 1 हजार रुपयांच्या सेटपर्यंत बांगड्या येथे उपलब्ध आहेत.
काळानुरूप बांगड्यांचा प्रकार आणि मागणी मध्ये देखील बदल झाला आहे.
सध्या दुल्हन सेट, कंगन, मॅचिंग सेट, जयपुरी सेट, स्टोन बँगल्स आदींची मागणी आहे.
गावाकडचे नुडल्स सरगुंडे!
गावाकडचे नुडल्स सरगुंडे!
Click Here