सध्याच्या काळात अनेक शेतकरी पारंपरकि शेतीला फाटा देऊन आधुनिक शेती करत आहेत.
मराठवाड्यातील मांजरा खोऱ्यातील माती आणि हवामान रेशीम शेतीला अनुकूल आहे.
लातूर जिल्ह्यातील हरंगुळ येथील शेतकऱ्यांनी हेच ओळखून पारंपरिक शेतीला फाटा दिला.
शेतकरी बरकत शेख 2020 पर्यंत आपल्या शेतात पारंपरिक पिके घेत होते.
रेशीम शेतीविषयी माहिती मिळाल्यानंतर शेख यांनी रेशीम विकास कार्यालयाकडे नोंदणी केली.
शेख यांनी दीड एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करून रेशीम शेतीला सुरुवात केली.
रेशीम शेतीमधून दर तीन महिन्याला एकरी 70 ते 80 हजाराचे उत्पन्न मिळते.
रामनगर (बेंगलोर) येथील रेशीम मार्केटमध्ये रेशीम कोषांची विक्री केली जाते.
यंदा रेशीम कोषांना प्रतिकिलो 745 रुपये दर मिळाला त्यामुळे 3.5 लाखांचे उत्पन्न मिळाले.
रेशीम शेती फायद्याची असून शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग केले पाहिजे, असे शेख सांगतात.
सांगलीच्या पैलवानाची थंडाई पोहोचली दुबईत!
Click Here