अलीकडे शेती आणि शेती संबंधित उद्योगांकडे उच्चशिक्षित तरुणांचा कल वाढतोय.
आधुनिक शेती आणि शेती पुरक व्यवसायांत महिला वर्गही पुढे आला आहे.
लातूर जिल्ह्यातील उच्चशिक्षित महिलेनं खासगी नोकरी सोडून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला.
विज्ञान शाखेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या कविता वाडीवाले यांनी कृषी पुरक व्यवसाय सुरू केला.
वाडीवाले यांनी आर्या ऑरगॅनिक या नावानं स्वत:ची कंपनी सुरू केली.
चाकुर तालुक्यातील येलमवाडी येथे गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला.
गावातील महिलांना एकत्र करून त्यांनी गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण दिले.
आता कविता वाडीवाले यांची वार्षिक उलाढाल 8 लाखांच्या घरात आहे.
गांडूळ खताची एक किलो, 5 किलो आणि 20 किलो अशा तीन प्रकारात विक्री केली जाते.
वाडीवाले यांच्या गांडूळ खताला नर्सरी आणि प्रगत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
Click Here