टिकल्या आंबा लागवडीतून लाखोंची कमाई

उन्हाळा सुरू होताच फळांचा राजा आंब्याची चाहुल लागते. 

कोकणच्या केशर आंब्याची वेगळी ओळख आहे. तसाच अहमदनगर मधील टिकल्या आंबाही प्रसिद्ध आहे. 

पारनेर तालुक्यातील तिखोलच्या गावरान टिकल्या आंब्याची चवच न्यारी आहे. 

तिखोल गावात टिकल्या आंब्याचे एकमेव झाड होते. आंबा विक्रीसाठी येताच त्याची मिरवणूक काढली जात होती. 

टिकल्या आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर होता. पठारी ठाणगे यांनी याच आंब्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. 

त्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असणारा टिकल्या आंबा पुनर्जिवित झाला. 

सध्या 70 हून अधिक झाडे आंब्याने बहरली असून बाजारात विक्रीसाठी तयार आहेत. 

सध्या एका झाडाला 2 ते 3 क्विंटल आंबा निघत आहे. तर दोनशे रुपये प्रति किलोने दर मिळत आहे. 

वर्षाकाठी ठाणगे यांना तीन ते साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळते. 

मूळ टिकल्या आंब्याचा आकार, रंग, चव, कोयीचा आकार अत्यंत लहान आहे. 

फळे झाडाला लागताना एकाच जागेवर 10 ते 15 लागतात. आंब्याची टिकवणक्षमता सुद्धा जास्त आहे.