आंबट, गोड फळं खायला आपल्याला खूप आवडतात. परंतु काही फळांचे औषधी गुणधर्मही असतात हे आपल्याला माहित नसतं.

असंच एक औषधी फळ राजस्थानात मिळतं.

गुंदी किंवा लसोडा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या फळाच्या वनस्पतीला 'कॉर्डिया मायक्सा' म्हणतात. 

पूर्वी हे फळ बिकानेरच्या शहरी भागात मिळायचं मात्र वाढत्या शहरीकरणात वृक्षतोड झाल्यामुळे या वनस्पतींचं प्रमाण कमी झालं.

महत्त्वाचं म्हणजे या वनस्पतीची औषधी फळं केवळ मे आणि जून अशी दोन महिनेच येतात.

कमी कालावधीसाठी मिळणाऱ्या या फळांना मागणीही मोठ्या प्रमाणात असते. प्रतिकिलो 180 ते 200 रुपये दराने ते विकले जातात.

मुबलक प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियम असल्याने ही फळं अनेक आजारांवर मात करतात. 

या फळांच्या सेवनाने पोटात थंड वाटतं. पचनास मदत होते. 

यकृताचं कार्यही सुरळीत चालतं. रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्वचेसंबंधित रोग बरे होतात आणि पांढरे केस काळे करण्यासही हे फळ रामबाण ठरतं.

आपण ही फळं कच्ची खाण्याबरोबरच त्यांची भाजी आणि लोणचंही बनवू शकतो.