नागापेक्षाही खतरनाक 'सायलंट किलर'
राजस्थानच्या कोटा भागातील एका घरात मध्यरात्री सर्वजण साखरझोपेत असताना आढळला भारतातला सर्वात विषारी साप.
घरातील एक व्यक्ती रात्री पाणी प्यायला उठली. गेटजवळ काहीतरी वळवळताना दिसलं. निरखून पाहिल्यावर ती जीव मुठीत घेऊन पळाली.
सर्पमित्र येताच घरात 3 फूट लांब इंडियन करैत प्रजातीचा साप आढळला.
हा साप चावल्यास वेळेत उपचार मिळाले नाहीत, तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. कारण नागापेक्षाही तो विषारी असतो.
तो मध्यरात्री येतो आणि व्यक्तीला झोपेतच डसतो. म्हणूनच त्याला सायलंट किलर म्हणतात.
तो चावल्यावर केवळ डास चावल्यासारखं जाणवतं, मात्र त्याचं विष शरीरात झपाट्याने पसरतं.
तो चावल्यानंतर 45 मिनिटांत व्यक्तीचा मुत्यू होतो. म्हणूनच हा भारतातला सर्वात खतरनाक साप मानला जातो.
तो दिसायला अतिशय सडपातळ आणि प्रचंड लांब असतो. त्याच्या काळ्या शरीरावर दोन-दोन पांढरे पट्टे असतात.
देशात घडणाऱ्या सर्पदंशाच्या घटनांमध्ये सर्वाधिक याच सापाचा समावेश असतो. तो साधारण 10 ते 17 वर्ष जगतो.