देवी देते दिवसातून 3 रुपात दर्शन!

कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे मध्य भारतातील एक महत्त्वाचे मंदिर आहे. 

नागपूर शहरापासून दक्षिणेस 20 किमी अंतरावर असणारं हे मंदिर लाखो भाविकांचं शक्तीपीठ आहे.

विदर्भासह लगतच्या राज्यांमधून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून कोराडी निवासिनीवर भाविकांची श्रद्धा आहे. 

महालक्ष्मी जगदंबा देवी दिवसांतून तीन रुपात भाविकांना दर्शन देते अशी आख्यायिका आहे.

देवी सकाळी कुमारिका, दुपारी सुहासिनी तर संध्याकाळी प्रौढ स्त्रीच्या रुपात दर्शन देते असं सांगितलं जातं. 

जगदंबा आणि महालक्ष्मी अशी दोन्ही रुपे एकाच देवीमध्ये बघायला मिळतात.

दरवर्षी आश्विन महिन्यातील नवरात्री व शारदीय नवरात्रौत्सवात कोराडी मंदिरात मोठी गर्दी होते. 

जलकुंडात उभे आहे कंकालेश्वर मंदिर

मंदिर प्रशासनाच्या वतीनं मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Click Here

जलकुंडात उभे आहे कंकालेश्वर मंदिर

सध्या मंदिरालगत असलेल्या तलावात 151 फूट हनुमान मूर्ती बनवण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. 

जलकुंडात उभे आहे कंकालेश्वर मंदिर

बीडमधील 'ही' 5 ठिकाणे नक्की पाहा!

Click Here