कोल्हापूरची विक्रमवीर कन्या अन्वी चेतन घाटगे हिने नुकतेच कळसुबाई शिखर दुसऱ्यांदा सर केले आहे.
समुद्रसपाटीपासून 1646 मीटर उंचीवर असलेले हे कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
हातकणंगले तालुक्यातील नेजची अन्वी चेतन घाटगे ही फक्त 3 वर्षे 11 महिन्यांची गिर्यारोहक आहे.
गतवर्षी 1 जुलै 2022 रोजी अन्वीने फक्त 2 वर्षे 11 महिन्यांची असताना पहिल्यांदा कळसुबाई शिखर सर केले होते.
तिच्या या असाधारण कामगिरीची नोंद इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड् आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड् मध्ये झाली आहे.
तसेच वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीने देखील तिला 'यंगेस्ट माऊंटेनियर' हा किताब दिलेला आहे.
1 जुलै रोजी अन्वीने आई अनिता, वडील चेतन आणि प्रा. मगर यांच्यासह कळसुबाई सर करण्यास सुरवात केली.
मुसळधार पाऊस, दाट धुके, तसेच प्रंचड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याशी सामना करत ती शिखरावर पोहचली.
केवळ 3 वर्षे 11 महिन्यांच्या वयामध्ये रतनगड सर करणारी अन्वी सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे.
मे 2023 मध्ये अन्वीने कोकणातील 10 गडकिल्ले आपल्या आईच्या मदतीने फक्त 3 दिवसांत सर केले होते.
आतापर्यंत अन्वीने दक्षिण भारतातील 7 किल्ल्यांसह महाराष्ट्रातील एकूण 38 किल्ले सर केले आहेत.
पाकिस्तानातील देवी सोलापुरात!
Click Here