कोल्हापूरच्या सिद्धनाथची गरुडझेप!

कुस्ती पंढरी कोल्हापुरातील अनेक पैलवान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत असतात. 

घरची परिस्थिती प्रतिकूल असली तरी देखील जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अनेक मैदाने मारतात. 

असाच परिस्थिशी संघर्ष करत कोल्हापुरी मल्ल सिध्दनाथ पाटील यांनं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारलीय. 

नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सिद्धनाथनं रौप्य पदकाची कमाई केलीय. 

युनायटेड वर्ल्ड रेस्टलिंगतर्फे आयोजित स्पर्धेत 17 वर्षांखालील 48 किलो वजनी गटात त्याने ही कामगिरी केलीय.

सिध्दनाथ पाटील हा कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात आमशी गावचा तरुण आहे. 

गेली सहा वर्षे तो जवळच दोनवडे येथे असणाऱ्या कुस्ती कोच संदीप पाटील यांच्याकडे प्रशिक्षण घेतोय. 

सिद्धनाथने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 2021 आणि 2022 साली सुवर्णपदकांची कमाई केली होती. 

सिद्धनाथची घरची परिस्थिती बेताची असून वडील दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहेत. 

वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झालेल्या सिद्धनाथला मदतीची गरज आहे. 

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दंगल गर्ल मैदानात!

Click Here