कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडजवळ जिल्हा परिषद कॉलनी या ठिकाणी अगदी हे अनोखे नागेश्वर मंदिर आहे.
या मंदिराला चक्क संपूर्ण भारतातून सर्वोत्कृष्ट स्थापत्यकलेबद्दलचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
हे मंदिर एका सोसायटीने बांधलेले आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मस्तकावर नागदेवता आहे.
याच नागदेवतेचे हे स्वतंत्र मंदिर म्हणजे श्री नागेश्वर मंदिर आहे.
खरंतर शिवालय आणि त्यासोबत नागमंदिर अशी संकल्पना असताना अशा स्वरूपाची काही मंदिरे कोल्हापूरात आहेतच.
मात्र केवळ नागदेवतेची उपासनाक्षेत्र म्हणून नागांच्या 9 कुळांचे शिल्पांकन असणारे असे हे श्री नागेश्वर मंदिर 30 एप्रिल 2017 पासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
हे मंदिर स्थापत्य शास्त्राचा योग्य अभ्यास करुन उभारण्यात आले आहे.
त्यानुसार मंदिराचा खालचा पायथा हा 6 फुटांचा, 9 फूट उंच भिंत आणि 13 फुटांचे शिखर असे हे मंदिर उभारण्यात आले आहे.
ज्या प्रमाणे गणेश मंदिरात अष्ट विनायकांची शिल्पे असतात. देवीच्या मंदिरात योगिनी किंवा नवदुर्गा असतात.
गांधींच्या काळापासून 'वेस्ट' ते बेस्ट!
तसेच करवीर क्षेत्रात पश्चिमेला असणाऱ्या या शेषनागाच्या अष्टकोनी मंदिरात नागांच्या 9 कुळांचे दर्शन घेता येते.
Click Here