TDM आणि इंदुरीकर महाराजांचं कनेक्शन!

लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज कीर्तनातून सामाजिक घडामोडींवर भाष्य करतात. 

अनेकदा त्यांनी कीर्तनात वापरलेली विशेषणं बोली भाषेचा भाग बणून जातात. 

आता इंदुरीकर महाराजांच्या अशाच एका शब्दावरून मराठी चित्रपटाला नाव देण्यात आलंय. 

गेल्या काही काळापासून वादात असणाऱ्या चित्रपट 'टीडीएम'चं नाव असंच एक विशेषण आहे. 

याबाबत खुद्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनीच माहिती दिलीय. 

इंदुरीकर महाराजांनी 2002 मध्ये आपल्या कीर्तनातून महाराष्ट्रतल्या तरुणांना टीडीएम ही पदवीच दिली होती.

ज्यांचे शिक्षण कमी, ज्यांना परिस्थितीमुळे शिकता आले नाही, अशा सगळ्यांसाठी ही पदवी होती. 

टीडीएम म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं होतं. 

यावरूनच चित्रपटाला टीडीएम हे नाव दिलं असून ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या आयुष्यावरच हा चित्रपट आहे. 

9 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला आहे. 

पठ्ठ्यानं मुंबई पोलीस होऊनच दाखवलं!

Click Here