‘या’ वडापावची आहे ‘नाद खुळा’ गोष्ट!

एखाद्या खाद्यपदार्थाच्या ठिकाणाला त्याच्या जवळपास असणाऱ्या एखाद्या गोष्टीमुळे विशेष ओळख मिळत असते. 

 कोल्हापुरातीलएका हॉटेलला एका झाडामुळे नवी ओळख मिळाली होती. 

 गेल्या 50 वर्षांपासून त्यांची ही ओळख कायम आहे. ही ओळख जपण्यासाठी त्यांनी एक अफाट काम केलंय. 

ते समजल्यानंतर तुम्ही नक्कीच कोल्हापूरकर 'लय भारी' असं नक्की म्हणाल.

कोल्हापुरात रुईकर कॉलनीजवळ झाडाखालचा वडापाव मिळतो. 

 आता हे मोठे हॉटेल झालंय. इथं यापूर्वी फक्त वडापावची एक छोटी गाडी होती. 

साकीब कोण्णूर हे या हॉटेलचे मालक असून ते त्यांचा भाऊ आणि मामासह हॉटेल चालवतात. 

साकीब यांच्या आजोबांनी 1972 साली वडाच्या झाडाखाली चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.

त्यानंतर त्यांनी त्यासोबत वडा देखील विकायला सुरूवात केली.

 मात्र या गाड्याला काही नाव नसल्यामुळे ग्राहकांना पत्ता सांगताना हे 'झाडाखालचा वडापाव' असे नाव प्रचलित झाल्याचे साकिब कोण्णूर यांनी सांगितले.

झाडाखालचा वडापाव हा गाडा येथे मिळणाऱ्या वडापावच्या चवीमुळे कोल्हापूरात फेमस झाला.

अतिक्रमणाच्या कारणामुळे त्यांना हा गाडा हलवावा लागला. 2003 साली नवीन जागी हा गाडा सुरू झाला.

 त्यावेळी वडाच्या झाडामुळे आपल्याला नाव मिळाले, ते झाड देखील आपल्या सोबत हवे असे साकिब यांच्या आजोबांना वाटू लागले. 

त्यामुळे पूर्वीच्या ठिकाणी जवळपास 10 ते 15 फूट उंच वाढलेले वडाचे झाड मशिनच्या साहाय्याने काढून त्याचे नवीन गाड्या शेजारी पुनर्रोपण करण्यात आले आहे.

आज त्या झाडाचा एक डेरेदार वृक्ष बनला आहे.