शिव म्हणजे 'ईशान्य', वास्तूशास्त्रानुसार...
हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला महत्त्व. सुख, समृद्धी, धनसंपत्ती, भांडण, आजारपणाशी संबंध.
'ईशान्य' हे महादेवाचं दुसरं नाव. अर्थातच इथे देवाचा वास असतो.
पूर्व आणि उत्तर दिशेच्या मधला भाग म्हणजे ईशान्य दिशा.
वास्तूशास्त्रानुसार, देवघर ईशान्य दिशेतच असावं. हा कोपरा जितका स्वच्छ, तितकं घर समृद्ध.
घरातील ईशान्य कोपरा स्वच्छ असल्यास तिथे देवी लक्ष्मीचा वास निर्माण होतो.
ईशान्य कोपऱ्यात कोणतीही जड वस्तू ठेवू नये. अशा वस्तूंमुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार थांबतो.
या भागात चप्पल ठेवू नये, कचरा गोळा करू नये. अन्यथा नकारात्मक ऊर्जा संचारते.
नवविवाहित दाम्पत्याची खोली या भागात नसावी. परस्पर संबंध बिघडतात, अनावश्यक समस्या वाढतात.
पिण्याचं पाणी ठेवण्यासाठी ईशान्य दिशा उत्तम. नव्या घराचं जलस्रोत ईशान्य दिशेत बनवा.
ईशान्य भागात विहीर खोदणं अत्यंत शुभ. या विहिरीमुळे घरात ऐश्वर्य नांदतं.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.