याठिकाणी मिळतो स्वादिष्ट चटणीसह ब्रेड अन् आलू चॉप

जिथे चव आणि क्वालिटी चांगली असते, तिथे ग्राहकांची गर्दी आपसूकच होते.

धनबादच्या पोलीस लाईन रोड, जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर जय मां तारा नावाचे असेच एक दुकान आहे. 

याठिकाणी चविष्ट ब्रेड वडा, भजी आणि बटाटे वडा मिळतो. 

सुभाष मंडल आणि धनंजय मंडल दोन्ही भाऊ हे दुकान चालवतात. 

मागील 18 वर्षांपासून ते हे दुकान चालवत आहेत. 

वड्यांसोबत ते गोड आणि तिखट दोन्ही प्रकारच्या चटणीही देतात. 

दुपारी हा स्टॉल सुरू होतो. त्यानंतर रात्री 8 पर्यंत त्यांचा सर्व माल संपतो.

स्टॉलवर ब्रे़ड वडा हा 7 रुपयांना, बटाटे वडा हा 6 रुपयांना आणि प्याजी 6 रुपयांना मिळतो. 

दुकान उघडल्यावर लगेच इथे मोठी गर्दी होते, अशी इथली विशेषत: आहे.