विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग

वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये परसबाग स्पर्धा झाली.

परसबाग स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण केली जाते.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग उपक्रम राबविला जातो. 

केंद्र, तालुका आणि जिल्हा स्तरावर शाळांचे तीन नंबर काढले जातात. 

जिल्हास्तरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आष्टा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

लिंगापूरला द्वितीय, तर पांजरा (गोंडी) येथील शाळेला तृतीय क्रमांक मिळाला.

परसबागेत भेंडी, कांदा, कोबी, मेथी, मुळा, गवार, वांगी आदी लावले जाते. 

परसबागेत पिकणाऱ्या भाज्या विद्यार्थी मध्यान्ह आहारात खातात. 

कमी पाणी, कमी जागेत विद्यार्थी भाजीचे चांगले उत्पादन घेतात.

ही परसबाग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरीही येत असतात.