गायीच्या शेणापासून बनवली कोल्हापुरी चप्पल!
कोल्हापूरच्या ब्रँडला कोल्हापुरातील एका व्यावसायिकाने वेगळे रूप दिले आहे.
त्यांने चक्क गाईच्या शेणापासून
कोल्हापुरी चप्पल बनवली आहे.
कोल्हापूरचे व्यावसायिक किरण माळी यांनी ही चप्पल तयार केली आहे.
या चप्पलला त्यांनी गोमय पादुका असे नाव दिले आहे.
या गोमय पादुका बनवण्यासाठी देशी गाईचे शेण, लाकडाचा भुस्सा, लाकडी मैदा या गोष्टींचा वापर करण्यात आला आहे.
मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडांचा त्रास हे आजर दूर करण्यासाठी या पादुका परिणामकारक आहेत.
या पादुका आपल्या चांगल्या आरोग्यासाठी वापरल्या जाव्यात या उद्देशानेच बनवलेल्या असल्याचे माळी यांनी सांगितलं.