औरंगाबादची प्रसिद्धी जिलेबी खाल्लीय?
औरंगाबादमध्ये खव्याची जिलेबी हा स्पेशल पदार्थ गेल्या 30 वर्षांपासून खवय्यांना भुरळ घालतोय.
औरंगाबाद शहरातील चेरिपुरा भागामधील रहिवासी मोहम्मद इस्माईल यांनी 30 वर्षांपूर्वी औरंगाबाद शहरामध्ये विशेष पदार्थ आणण्याचं ठरवलं.
त्यानंतर त्यांनी स्पेशल खव्याची जिलेबी हा पदार्थ सुरू केला.
इस्माईल यांची तिसरी पिढी आता या दुकानात काम करते.
पण येथील चव 30 वर्षांपासून तशीच आहे.
या स्पेशल जिलेबीबद्दल माहिती सांगताना मोहम्मद जावेद म्हणाले की, जिलेबी बनवण्यासाठी आम्ही विशेष पद्धतीचा खवा, दूध, साखर आणि डालडा याचा वापर करतो.
आमची जिलेबी बनवण्याची खास पद्धत आहे. त्यामुळे ही अधिक चवदार लागते.
या जिलेबीसोबत आम्ही तयार केलेले स्पेशल भजे खाण्याची मजा काही औरच आहे.
खव्याच्या जिलेबीची किंमत 280 रूपये प्रती किलो तर साधी जिलेबी 140 रुपये प्रती किलो मिळते.
भज्याची किंमत 240 रुपये प्रती किलो आहे.
कुठे खाणार जिलेबी भजे?
चेरिपुरा भागातील हे दुकान सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असतं.
तुम्ही अधिक माहितीसाठी 9325033895 या क्रमांकावर दुकान मालकाशी संपर्क साधू शकता.