केरळचा शिवभक्त हमरास!

महाराष्ट्राचे दैवत मानले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज जगभरातील अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. 

शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या गड-किल्ल्यांच्या साक्षीनं झाला तेही अनेकांना स्फूर्ती देतात. 

शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन केरळमधील एका तरुणानं मोठी मोहीम हाती घेतलीय.

हमरास ए. के. हा सायकलवरून महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर करतोय. 

आतापर्यंत त्याने सायकल वरून 10,700 कि.मी.चा प्रवास केला आहे.

हमरासने आतापर्यंत 194 किल्ले सायकलवरून सर केले आहेत.

युट्युबच्या माध्यमातून शिवरायांची माहिती मिळाल्यानंतर हमरास भारावून गेला. 

शिवाजी महाराजांच्या इतिहासाने प्रेरित होऊन त्यानं ही मोहीम हाती घेतली. 

महाराष्ट्रातील 370 गड - किल्ल्यांना भेट देण्याचा निश्चय त्यानं केला आहे. 

लोणावळा परिसरात झालेल्या अपघातानंही त्यानं हे व्रत सोडलेलं नाही. 

बैलगाडी अपघातानं घडवला लेखक!

Click Here