श्रावणात चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ
हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना श्रावण आहे काहीच दिवसांवर...
श्रावणात विधिवत पूजेसह जेवणाबाबत पाळले जातात अनेक पथ्य.
श्रावणी पथ्यांमागे असते धार्मिक श्रद्धा आणि शास्त्रीय कारण.
श्रावण म्हणजे पाऊस. पावसात पचनशक्ती कमकुवत होते, म्हणून प्रकृतीस जपावे लागते.
थंड वातावरणात दह्यासारखे थंड पदार्थ खाऊन सर्दी होते, ताप येतो.
दूध प्यायल्यास पोटाचे विकार होण्याची शक्यता असते.
तळलेल्या पदार्थांकडे तर पाहूच नये, आधीच कमकुवत पचनशक्ती आणखी होते कमजोर.
पावसातले किडे पालेभाज्यांना चिकटू शकतात, त्या खाणं टाळलेलंच बरं.
'पाऊस म्हणजे आजारांना निमंत्रण' हे काही वेगळं सांगायला नको. म्हणून...काळजी घ्या, निरोगी राहा.